You are currently viewing नानेली व माणगांव मधील ग्रामस्थांचा मसेनेत प्रवेश..

नानेली व माणगांव मधील ग्रामस्थांचा मसेनेत प्रवेश..

कुडाळ /-

आज माणगाव व नानेली मधील ग्रामस्थांनी मनसेत प्रवेश केला.यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी तालुका अध्यक्ष बाबत गावडे, म. न. वि. से. जिल्हा अध्यक्ष कुणाल किणळेकर,तालुका सचिव राजेश टंगसाळी,विभाग अध्यक्ष सचिन ठाकूर, उप तालुका अध्यक्ष माणगांव सचिन सावंत,शाखा अध्यक्ष नानेली अनिकेत धुरी, अभिषेक घाडि,म.न.वि.से.शाखा अध्यक्ष प्रताप भोई. साळगांव शाखाध्यक्ष संदेश करपे आदी पदाधिकारी तर विकास लाड, श्रीराज मोरजकर,उत्तम नेवगी,रोहित कळसुलकर.अक्षय सावंत,सौ.सेजल सावंत आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. ज्या शिवसेनेने माणगाव खोऱ्याला भरभरून दिले त्यांनी माणगांव खोऱ्यावर पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने विकासाच्या बाबतीत मागे ठेवले.आंबेरी पूल,वनसंज्ञा,खड्डेमय रस्ते असे सर्वागीण प्रश्न सोडवू शकले नसल्याने तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी सत्ताधारी सेनेवर चौफेर टीका केली.कु श्रावणी धुरी, दत्तप्रसाद वारंग, वासुदेव घाडी,कृष्णा घाडी, संतोष घाडी, जनार्दन घाडी, महादेव घाडी, प्रसाद भिसे, चेतन नार्वेकर, केदार नार्वेकर,मिलिंद धुरी,संतोष घाडी,भागीरथी घाडी आदी ग्रामस्थांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

अभिप्राय द्या..