You are currently viewing तिलारीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात भाजप घालणार अधिकाऱ्यांना घेराओ.;नगराध्यक्ष संजू परब.

तिलारीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात भाजप घालणार अधिकाऱ्यांना घेराओ.;नगराध्यक्ष संजू परब.

सावंतवाडी /-

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी 40 वर्षांपूर्वी तिलारी प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. परंतु अजूनही तो प्रकल्प अपूर्ण आहे. या प्रलंबित कामाबद्दल येत्या आठ दिवसात भाजपच्या शिष्टमंडळासह जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपचे सर्व पदाधिकाऱ्यांसह घेराव घालून जाब विचारला जाईल, असा इशारा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सध्याच या प्रकल्पाचे कालवे फुटत आहेत. अधिकाऱ्यांकडून कालव्यांची लाईफ संपल्याची माहिती दिली जात आहे. मात्र तिलारी कालव्याच्या काही भागात अद्यापपर्यंत पाणीच सोडण्यात आलेले नाही. तरीही त्या कालव्याची लाईफ संपली कशी याची माहिती
घेऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर आणणार असल्याचा इशारा यावेळी संजू परब यांनी दिला. यावेळी शहर भाजपा सचिव बंटी पुरोहित उपस्थित होते.

अभिप्राय द्या..