You are currently viewing प.पू.राऊळ महाराज यांची ११७ वी जयंती उत्सव उद्द्या बुधवारी २० ऑक्टोबरला.

प.पू.राऊळ महाराज यांची ११७ वी जयंती उत्सव उद्द्या बुधवारी २० ऑक्टोबरला.

कुडाळ /-


पिंगुळी येथील श्री प.पू स.स .राऊळ महाराज यांची ११७ वी जयंती उत्सव बुधवार दिनांक २० ऑक्टोंबर रोजी परमपूज्य राऊळ महाराज समाधी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त पहाटे ५ ते ६ काकड आरती, सकाळी ७ वाजता परमपूज्य राऊळ महाराज समाधीस्थानी अभिषेक, सकाळी ८ ते १० सार्वजनिक अभिषेक एकादशणी, सकाळी १० ते ११ परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज समाधी स्थानी अभिषेक, दुपारी 12 ते 1 परमपूज्य महाराजांची आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी २ ते ३ प.पू. महाराजांचा जन्मोत्सव व 117 सुहासिनी च्या हस्ते पाळणा झोका कार्यक्रम, दुपारी ३ ते ४.३० परमपूज्य राऊळ महाराज महिला भजन मंडळ यांचे भजन, सायंकाळी ४.३० ते ५.३० महापुरुष भजन मंडळ शेटकरवाडी पिंगुळी यांचे भजन, सायंकाळी ७ ते ७.३० सांजआरती, सायंकाळी ७.३० वाजता परम पूज्य महाराजांचा पादुकांची पालखी व दिंडी मिरवणूक, रात्री आठ ते दहा महाप्रसाद, रात्री दहा वाजता परमपूज्य राऊळ महाराज भजन मंडळाचे भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. कोरोना बाबतचे शासकीय सर्व नियम पाळून हा कार्यक्रम साजरा होणार आहे. यावेळी कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम होणार आहे .तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट पिंगुळी च्या वतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..