You are currently viewing रितेश सुतार यांची भाजपा चित्रपट कामगार आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड..

रितेश सुतार यांची भाजपा चित्रपट कामगार आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड..

वैभववाडी /-

लोरे नं. 2 येथील भाजपा शक्तिकेंद्रप्रमुख रितेश सुतार यांची भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय सिने कलाकार अँड कामगार संघटनेशी ही संघटना संलग्न आहे. भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय सरोज, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सत्यवान गावडे, भाजपा कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांनी पुढील 1 वर्षासाठी रितेश सुतार यांची ही नियुक्ती केली आहे. सामाजिक आणि चित्रपट कामगार क्षेत्रातील सहभाग लक्षात घेत रितेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सुतार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..