You are currently viewing ऍड.संग्राम देसाई यांची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल उपाध्यक्षपदी निवड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह.;आ.वैभव नाईक.

ऍड.संग्राम देसाई यांची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल उपाध्यक्षपदी निवड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह.;आ.वैभव नाईक.

कुडाळ /-

श्री. देव कुडाळेश्वर मंडळाच्या वतीने आ. वैभव नाईक यांच्या हस्ते ऍड. संग्राम देसाई यांचा सत्कार महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल उपाध्यक्षपदी ऍड. संग्राम देसाई यांची निवड झाल्याबद्दल कुडाळेश्वर मंदिरात श्री. देव कुडाळेश्वर मंडळाच्या वतीने व अभय देसाई भजन स्पर्धेच्या निमित्ताने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ऍड. संग्राम देसाई यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग सारख्या छोट्याशा जिल्ह्यातील असूनही श्री. देसाई यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. हि बाब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह आहे असे आ. वैभव नाईक यांनी सांगत, कोल्हापूर खंडपीठ होण्यासाठी श्री. देव कुडाळेश्वर श्री.देसाई यांना ताकद देवो अशी प्रार्थना आ. वैभव नाईक यांनी केली. या सत्काराबद्दल ऍड. संग्राम देसाई यांनी सर्वांचे आभार मानत हा सत्कार आपल्या कायम स्मरणात राहील असे सांगितले. यावेळी माजी सरपंच अरविंद शिरसाट, श्री. देव कुडाळेश्वर मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर, महेश कुडाळकर , ऍड. सुधीर भणगे, श्रीकृष्ण कुंठे नंदु कुंठे,शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, कृष्णा तेली, परीक्षक शेख गुरुजी, संजय दळवी आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..