कणकवली /-

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करत असताना वागदे उभादेव समोरील जमीन मालकांना अद्यापही मोबदला मिळाला नाही. दरम्यान वागदेत हळवल फाटा व पेट्रोल पंपासमोर दोन अपघात आज झाल्याने पोलिसांनी मोबदला द्यायची रक्कम असलेला जमीनीचा भाग वगळता मिडल कट देऊन वाहतूक सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी जमीन मालक घाडीगावकर कुटूंबियांनी “मिडल कट”च्या कामाला कडवा विरोध करत काम बंद पाडले. अखेर प्रताधिकारी व उपअभियंता यांच्या उपस्थितीत पोलिसांसमक्ष बैठक घेण्याच्या मुद्द्यावर काम बंद करत आंदोलन थांबवण्यात आले आहे.प्रसंगी, घाडीगावकर कुटुंबियांच्या वतीने मोबदला न मिळाल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देखील या वेळी देण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर वागदे येथे मोठ्या प्रमाणात एकमार्गी वाहतुकीमुळे अनेक अपघात होत आहेत. त्याचप्रमाणे आज वेगवेगळे दोन अपघात झाले, यात अनेक जखमी झाले आहेत. त्यामुळे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात आर्यादुर्गा फाट्या समोर मिडल कट करत होणारे अपघात रोखण्यासाठी काम जेसीबीच्या सहाय्याने चालू केलं होतं. त्यावेळी जमीन मालकांनी कडवा विरोध केला.

“यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, वाहतूक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, पोलीस उप निरीक्षक विनायक चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल पांडूरंग पांढरे, किरण बाळू मेस्त्री, वागदे उपसरपंच रुपेश आमडोस्कर, लक्ष्मण घाडीगांवकर, जमीन मालक बाबाजी घाडीगावकर, महादेव घाडीगावकर, सखाराम घाडीगावकर, शिवराम घाडीगावकर, दत्ताराम घाडीगावकर, एकनाथ घाडीगावकर, प्रकाश परब व वाहतुक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी साहेब पोलीस निरीक्षक श्री. खंडागळे यांच्यासमोर जमीन मालकांनी तात्पुरती उपाययोजना करून आमच्या पोटावर मारु नका. आमच्या पेशाची जबाबदारी कोण घेणार? अनेक लोकांनी आश्वासने दिली. अद्याप आमचा मोबदला मिळालेला नाही. प्रांत अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी जमीन मालकांनी केला. शेवटी झालेल्या वादाबाबत व कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार पोलीस व जमीन मालक यांची संयुक्त बैठक आयोजित करून यावर निर्णय घेण्याच्या मुद्यावर काम बंद करण्यात आले. त्यावेळी काही काळ वातावरण तणावग्रस्त बनले होते.

यावेळी साहेब पोलीस निरीM.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page