You are currently viewing कुडाळ येथिल व्यापारी गजानन वेंगुर्लेकर यांचा असाही प्रामाणीकपणा.;दुकानात सापडलेली 25 हजार किंमतीची सोन्याची चैन ग्राहकास केली परत..

कुडाळ येथिल व्यापारी गजानन वेंगुर्लेकर यांचा असाही प्रामाणीकपणा.;दुकानात सापडलेली 25 हजार किंमतीची सोन्याची चैन ग्राहकास केली परत..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील शिवाजीनगर येथील व्यापारी मे.गजानन फर्निचर मालक तसेच कुडाळ भंडारी समाज कुडाळ लचे अधक्ष श्री.गजानन वेंगुर्लेकर यांचा एक असाही प्रामाणीकपणा आज समोर आला आहे.काल सायंकाळी ओरोस येथील ग्राहक श्रीमती रोहिणी रामचंद्र तांबे -सिद्धार्थ नगर ओरोस हे गजानन वेंगुर्लेकर यांच्या दुकानात सामान खरेदी साठी गेले होते.मात्र तेथील त्यांचे काम आटोपून त्या ईतर सामान खरेदीसाठी मार्केटमद्धे गेले या दरम्यानच्या कालावधी त्याच्याकडे असलेली पाच ग्रॅम सोन्याची चैन हरवली आणि सद्याच्या मार्केट भावाने त्याची 25 हजार येवडी किंमत आहे.त्यांनी सर्व ठिकाणी शोध घेतला मात्र चैन सापडली नाही त्यांनी आज गजानन वेंगुर्लेकर यांच्या दुकानात येऊन त्या चैन ची योग्य रीतीने ओळख पटवून गजानन वेंगुर्लेकर यांनी त्या ग्राहकास 25 हजार किमतीची सोन्याची चैन परत केली आहे.या प्रामाणिक स्वभावामुळे गजानन वेंगुर्लेकर यांचे सर्व कौतुक होत आहे.

अभिप्राय द्या..