You are currently viewing पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल..

पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल..

देवगड /-

कणकवली तालुक्यातील करंजे सोनारवाडी येथील शितल दळवी या विवाहित महिलेला पतीने मानसिक शारीरिक त्रास देऊन मारहाण केल्याप्रकरणी पती योगेश शामसुंदर दळवी याच्याविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा कणकवली तालुक्यातील असल्यामुळे देवगड पोलीस हा गुन्हा कणकवली पोलिसांकडे वर्ग केला आहे. करंजे सोनारवाडी येथील शितल योगेश दळवी वय वर्षे ३१ हिचा विवाह योगेश शामसुंदर दळवी वय ३३ राहणार करंजे सोनारवाडी कणकवली याच्याशी २०१५ साली झाला होता. त्यावेळेपासून शीतलला मानसिक व शारीरिक त्रास तिचे पती योगेश देत होते १२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास शीतल व त्याचे पती योगेश यांच्या मध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाले. या वादामध्ये योगेश यांनी पत्नीला बेदम मारहाण केली त्यामुळे शितल दळवी ही आपल्या माहेरी देवगड तालुक्यात राहायला आली व तीने आपल्याला पती त्रास देत असल्याची सर्व माहिती माहेरील मंडळी व नातेवाईकांना दिली यावरून शितल हिने आपल्या नातेवाईकांसह गुरुवारी देवगड पोलीस ठाणे मध्ये जाऊन आपल्याला आपले पती मानसिक शारीरिक त्रास देऊन मारहाण करत असल्याची तक्रार देवगड पोलीस स्थानकांमध्ये दिली असून देवगड पोलिसांनी योगेश दळवी त्यांच्याविरुद्ध ४९८ नुसार गुन्हा दाखल करून कणकवली तालुक्यातील सदरची घटना व सदर च्या व्यक्ती असल्याने हा गुन्हा कणकवली पोलिस स्थानकामध्ये वर्ग करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..