You are currently viewing २३ लाख लुटीचा बनाव करणाऱ्या युवकांना कुडाळमधून पोलिसांनी घेतले ताब्यात..

२३ लाख लुटीचा बनाव करणाऱ्या युवकांना कुडाळमधून पोलिसांनी घेतले ताब्यात..

वैभववाडी/-

वैभववाडीत 23 लाख लुटीच्या बनावात सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींच्या वैभववाडी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.सदर दोन्ही आरोपींना कुडाळ येथून ताब्यात घेतले आहे.चोरीतील 23 लाख रुपये रक्कम या दोन आरोपींकडे पोलिसांना सापडली आहे.लाडू उर्फ निखील सदाशिव वेंगुर्लेकर वय 30 रा. कोचरे वेंगुर्ला सध्या राहणार एमआयडीसी कुडाळ, व किरण प्रभाकर गावडे वय 32 रा. नेरूर वाघाचीवाडी कुडाळ या आरोपींचा समावेश आहे. गुन्ह्यात वापरलेली वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. एटीएम कंपनीचा कर्मचारी मुख्य आरोपी सगुन मनोहर केरवडेकर वय 33 रा. केरवडे कुडाळ व विठ्ठल जाणू खरात वय 30 रा.याना वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अभिप्राय द्या..