You are currently viewing निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ मध्ये गजानन नरसुले यांच्याकडू शालोपयोगी वास्तूंचे वाटप..

निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ मध्ये गजानन नरसुले यांच्याकडू शालोपयोगी वास्तूंचे वाटप..

बांदा /-

निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ मध्ये सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त निगुडे गावचे सुपुत्र व सेवानिवृत्त अधिकारी गजानन दत्‍ताराम नरसुले यांच कडून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या एकूण ५८ विद्यार्थ्यांना शालेय वह्या, बिस्किट व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. निगुडे गावचे माजी सरपंच कै. विठ्ठल गणेश गावडे यांचे नातू विठ्ठल उर्फ विग्नेश अरुण गावडे यांनी मुलांच्या आरोग्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून सॅनिटायझर बॉटल शाळेतील विद्यार्थ्यांना व अंगणवाडी ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक ठिकाणी वाटण्यास दिले. सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक असंनकर गुरुजी यांनी केले. निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आम्ही तुम्हाला वेळोवेळी सहकार्य करू. आपण ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेत आम्ही शिकलो आहोत. आज आम्ही गावाचे लोकप्रतिनिधी आहोत तसेच तुम्ही पुढे व्हा मोठे अधिकारी व्हा. आज या शाळेमध्ये शिकून उपजिल्हाधिकारी, शिक्षक, डॉक्टर झाले त्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने आज भरपूर शिक्षण दिले जाते त्याचा पुरेपूर वापर करून आपली कार्यक्षमता, बुद्धी वापरून आपण आपल्या शाळेचं गावाचं नाव उज्वल करा. तसेच नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नेहा पोखरे, उपाध्यक्ष संजना केसरकर यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक विजय नेमळेकर यांनी गजानन नरसुले तसेच विठ्ठल गावडे यांचे आभार मानले. यावेळी गंधाली निगुडकर, रोहिणी गावडे, अरविंद नाईक, बाबलो गावडे, सविता गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..