You are currently viewing कुडाळ तालुका राष्ट्रीयकाँग्रेसच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता याना घेराव..

कुडाळ तालुका राष्ट्रीयकाँग्रेसच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता याना घेराव..

कुडाळ /-

कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांना निवेदन देऊन घेराव घालण्यात आला. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते या निवेदनाच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता विनोद पाटील साहेब यांनी
१)वीज ग्राहकांची कोरोना काळातील थकीत लाईट बीलासाठी वीज पुरवठा खंडित न करता त्यांना हप्त्यांमध्ये भरण्याची मुभा देण्यात आश्वासन दिले.
२)त्याच प्रमाणे तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे नंबर पब्लिष करण्याचे मान्य केले
३) वारंवार वीज खंडित होत असल्याबद्दल तात्काळ दखल घेऊन वीज खंडित न होता दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात वीज अखंडित चालू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले .
४)तसेच सर्विस वायर ज्यांचे कनेक्शन घेऊन पाच वर्ष झाली आहेत. त्या ग्राहकांना सर्विस वायरचे पैसे न घेता सर्विस वायर बदलून देण्याची देण्याचे मान्य केले.
४) शेतीपंपासाठी ज्यांनी पैसे भरले आहेत.त्या ती पंप मागणाऱ्या शेतकऱ्यांचे240 येत्या सहा महिन्यात देण्याचे मान्य केले.
५)) तेंडोली गावातील ट्रांसफार्मर जिल्हा नियोजन मधून मंजूर असून ते काम ठेकेदार पूर्ण करत नसल्यामुळे दुसऱ्या ठेकेदार नेमून किंवा त्या ठेकेदारा कडून तात्काळ काम करून घेण्याचे मान्य केले.
त्यामुळे तालुक्याच्या वतीने करण्यात आलेल्या घेराव आंदोलन यशस्वी झाले. या आंदोलनात सर्व सहभागी पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मनापासून आभार मानले.

अभिप्राय द्या..