You are currently viewing नवरात्रौत्सवानिमित्त आकेरी रवळनाथ मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

नवरात्रौत्सवानिमित्त आकेरी रवळनाथ मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

सावंतवाडी /-


नवरात्रौत्सवानिमित्त आकेरी रवळनाथ मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोरेखेळ झालो आणि सवाशिनच्या नवसाक विठ्ठल देव पावलो हा मालवणी भाषेतील स्थानिक कलाकारांचा नाट्यप्रयोग पार पडला. या कार्यक्रमानिमित्त गावातील मान्यवरांचाही सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी आकेरी गावचे सुपुत्र गुरुनाथ गुरव यांना आदर्श मंडळ अधिकारी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सह्दय सत्कार बाळा राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला.
मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव हे आंबोली मंडळात सन 2018 पासून काम करीत असून त्यांनी आपले तीन वर्षाचे कालावधीत सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामे सकारात्मक दृष्टीने चांगल्या प्रकारे केल्याने त्यांचे कामाची दखल घेऊन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांचेकडून आदर्श मंडळ अधिकारी पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचे चांगल्या कामाची दखल घेत ग्रामपंचायत माडखोल, कारिवडे, सातुली बावळट, शिरशींगे, वेरले या ग्रामपंचायतीने सत्कार केलेले आहेत
कोरोना ,अतिवृष्टी,महापूर आशा नैसर्गिक आपत्तीमध्येती मध्ये योग्य नियोजन करून चांगले काम केले.
तसेच सिताराम लांबर यांचा सत्कार रात्रीस खेळ चाले मधील माईंच्या हस्ते करण्यात आला. तसेच दादा सुतार यांचा सत्कार मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव यांच्या हस्ते पार पडला. बाळा राऊळ यांचा सत्कार उपसरपंच बाळा सावंत यांच्या हस्ते, रात्रीस खेळ चाले मालिकेतील माई यांचा सत्कार चारु भगत यांच्या हस्ते तर रात्रीस खेळ चाले मधील पूर्वा हिचा सत्कार अभिषेक राऊळ, बादल चौधरी यांचा सत्कार अण्णा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

अभिप्राय द्या..