You are currently viewing युवा फोरम भारत संघटनेच्या स्वयंसेवक यांच्याकडून शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी अँप बद्दल माहिती..

युवा फोरम भारत संघटनेच्या स्वयंसेवक यांच्याकडून शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी अँप बद्दल माहिती..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा क्र. १, सोनवडे तर्फ हवेली येथे ई – पीक नोंदणी बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी युवा फोरम भारत संघटनेचे स्वयंसेवक भूषण गावडे यांनी ई – पीक पाहणी अँप बद्दल फायदे, तोटे व इतर माहिती दिली. तसेच अँपचा वापर करून नोंदणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी सोनवडे तर्फ हवेली गावचे उपसरपंच सुधीर धुरी, जि.प. शाळेतील शिक्षिका, युवा फोरमचे स्वयंसेवक हर्षल देसाई, शुभम सिंदगीकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..