You are currently viewing ..आता तुम्ही गेल्या घरी सुखी रहा अतुल बंगे यांचा राजन जाधव यांना सल्ला

..आता तुम्ही गेल्या घरी सुखी रहा अतुल बंगे यांचा राजन जाधव यांना सल्ला

कुडाळ /-

शिवसेना पक्षाचा एक साधा कार्यकर्ता असूनही कुडाळ पंचायत समितीच्या सभापती हे मोठे पद राजन जाधव यांना शिवसेनेच्या माध्यमातूनच मिळाले याचा वापर त्यांनी जनसंपर्कासाठी करून यापेक्षा अनेक मोठी पदे भूषविली असती पण देव देतो आणि कर्म नेतो .अशी अवस्था जाधव यांची झाली आहे. त्यामुळे गेल्या घरी तुम्ही सुखी रहा असा सल्ला शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केला भाजपा मध्ये जाण्याची दुर्बुद्धी त्याना सुचली आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या पासून जाधव त्यांची सुरुवात झाली आहे असेच म्हणावे लागेल ही जाधव यांची प्रगती नसून अधोगतीच आहे.अशी खरमरीत टीका माजी सभापती राजन जाधव यांच्या शिवसेना प्रवेशा नंतर शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली आहे . जाधव यांना पुन्हा शिवसेनेचे दरवाजे ठोठवावे लागतील असे भकितही बंगे यांनी केले आहे.आता तुम्ही गेल्या घरी सुखी रहा परंतु येणा-या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे फक्त तिकिटच मिळवुन दाखवा असे आवाहन करताना बंगे म्हणाले आमदार वैभव नाईक यांनी आपली वेळोवेळी अपमानित केले किंवा विकास कामे केली नसल्याचा आरोप जाधव आणि त्यांच्या दोन सदस्यांनी केला होता यावर बंगे बोलताना म्हणाले आमदार वैभव नाईक असो वा खासदार विनायक राऊत असो यांनी कायमच शिवसैनिकांना सन्मान दीला परंतु सभापती पदाच्या खुर्चीवर बसल्या पासुन डोक्यात हवा गेलेल्या लोकांची किव कराविशी वाटते विकास कामे करताना कसलाही भेदभाव आम नाईक किंवा खा, राऊत यांनी केला नाही असे असताना तुम्ही स्वार्थासाठी पक्ष प्रवेश केलात म्हणुन आमदार वैभव नाईक किंवा खासदार विनायक राऊत यांच्यावर खापर फोडून नामा निराळे होऊ नका असा सबुरीचा सल्ला देत फक्त येणा-या जि प निवडणुकीत तुम्ही भाजप कडुन तिकिट मिळवुन दाखवा असे आवाहन बंगे यांनी केले.

अभिप्राय द्या..