You are currently viewing शालेय पोषण आहाराअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणार..

शालेय पोषण आहाराअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणार..

सिंधुदुर्ग /-

कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यात शाळा सुरू झाल्या असल्याने शालेय पोषण आहाराअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून पाच दिवस हेल्दी पोषण आहार दिला जावा अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत.

त्यामुळे आता शालेय पोषण आहाराअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हेल्दी आहार मिळणार आहे.

या विद्यार्थ्यांनाच होईल वाटप : तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन यासह लोहयुक्त गव्हाचे पीठ, पीठीसाखर, खाद्यतेल, स्किम्ड दूध आणि इतर पोषक घटक वापरून ही न्युट्रीटीव्ह स्लाईस बनविण्यात येणार असून आकर्षक पद्धतीने सीलबंद पाकिटातून जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना त्याचे वाटप केले जाणार आहे.

याप्रमाणे होणार वाटप : एखाद्या मोठ्या ब्रँडला लाजवेल अशा आकर्षक पॅकिंग्जमध्ये सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणार आहे.बिस्किटच्या पुड्यासारख्या दिसणार्‍या पॅकिंग्जच्या स्वरुपात पोषण आहार दिला जाणार आहे.यात ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि सोयाबिन अशा वेगवेगळ्या पॅकेट्समधून हा पोषण आहार शाळांना पुरवला जाणार आहे.दरम्यान, राज्य सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ई-निविदा प्रक्रिया राबवून हा ठेका जालन्यातील दिव्या एस. आर. जे. फूड्स एलएपी कंपनीला देण्यात आला आहे. शाळांनी पुरवठादाराकडे मागणी केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत स्लाईसचा पुरवठा होणे बंधनकारक आहे, अशा सूचना शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत.

अभिप्राय द्या..