You are currently viewing कणकवलीत जंगलात सिलिका खाण कामगाराचा आढळला मृतदेह..

कणकवलीत जंगलात सिलिका खाण कामगाराचा आढळला मृतदेह..

कणकवली /-

सिलिका कामगार लालचंद रामू राठोड ( वय 45, रा. कासार्डे देऊलकरवाडी, ता.कणकवली ) याचा मृतदेह आवळेश्वर माळ जंगलात आढळून आला. मयत लालचंद याला दारूचे व्यसन होते. 10 ऑक्टोबर रोजी हाताला मुका मार लागल्यामुळे डॉक्टरकडे जाऊन येतो असे सांगून लालचंद घरातून बाहेर पडला होता.तो रात्रभर घरी परतला नाही. आज त्याचा नातेवाईकांनी शोध घेतला असता लालचंद याचा मृतदेह आवळेश्वर माळ जंगलात आढळून आला. याबाबतची खबर लालचंद याचा मुलगा प्रदीप याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.

अभिप्राय द्या..