नवी दिल्ली /-

▪️ जगभरात हाहाकार घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढतच आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५४ लाखांच्या पुढे गेली आहे.

*केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती* : गेल्या २४ तासांत देशात ९२ हजार ६०५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत, तर एक हजार १३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

▪️ *उपचार* : देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५४,००,०४४ इतकी झाली आहे. यापैकी १० लाख १० हजार ८२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ८६ हजार ७५२ जणांचा मृत्यू झाला आहे.

▪️ *दिलासा* : देशातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही दररोज वाढत आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्केंच्या जवळ पोहचले आहे. देशात आतापर्यंत ४३ लाख ३ हजार ४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

▪️ *चाचण्या* : देशात आतापर्यंत सहा कोटी ३६ लाख ६१ हजार ६० कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page