You are currently viewing पोक्सोसह लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी एकनाथ साळगावकरचा जामीन फेटाळला..

पोक्सोसह लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी एकनाथ साळगावकरचा जामीन फेटाळला..

सिंधुदुर्ग /-

अल्पवयीन युवतीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी एकनाथ राजाराम साळगावकर ( वय 32 , रा.आमडोस, व्हाळवाडी, ता.मालवण ) याचा जामीन अर्ज जिल्हा विशेष न्यायालयाने फेटाळत एकनाथ ची रवानगी जेलमध्ये केली. आरोपी एकनाथ साळगावकर याने पीडित अल्पवयीन युवतीला प्रेमाच्या जाळयात फसवून तिचा अश्लील व्हिडीओ मोबाईलवर तयार केला होता. त्याआधारे पीडित युवतीवर लैंगिक अत्याचारही आरोपी एकनाथ याने केला होता. तसेच पीडित युवतीने भेटण्यास नकार दिल्यावर त्या व्हिडिओचा स्क्रिनशॉट पीडित युवतीच्या नातेवाईकांना पाठवला होता. तसेच सोशल मीडियावर पीडित युवतीची बदनामी केली. याविरोधात पीडित अल्पवयीन युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी एकनाथ राजाराम साळगावकर याच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात भा. दं. वि. 376 (1), 376 (2) (n), 376 (3), 354 (A), (1), (i), 354 (B ) 354 (D), 506, पोक्सो अधिनियम 2012 क – 4,8,12, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालवण पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांनी स्वतः या गुन्ह्याचा शिग्रगतीने तपास करून आरोपी एकनाथ याच्या अवघ्या साडेसहा तासांत मुसक्या आवळल्या होत्या. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी एकनाथ याने जामीन मंजुरीसाठी जिल्हा विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आरोपीच्या जामीन अर्जाला जोरदार हरकत घेताना सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी हा पीडित आणि साक्षीदारांवर प्रलोभने दाखवून दबाव आणून साक्ष देण्यापासून परावृत्त करू शकतो, पिडीतेच्या व साक्षीदारांच्या जीवाला धोका पोचवू शकतो, गुन्ह्यातील पुरावे नष्ट करू शकतो, तसेच न्यायालयीन कामकाजावेळी आवश्यक असेल तेव्हा हजर राहू शकणार नाही या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. सरकारी वकील देसाई यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर विशेष जिल्हा न्यायालयाने आरोपी एकनाथ साळगावकर याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

प्रतिक्रिया व्यक्त करा