मुंबई /-

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, सर्व यंत्रणांनी ही मदत लवकरात-लवकर बाधीतांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घावी, असे स्पष्ट निर्देश देखील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

शेतीच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप विभागांनुसार होणार आहे. यामध्ये पुणे विभागासाठी १५० कोटी १२ लाख रुपये, कोकण विभागासाठी ८ कोटी ५१ लाख रुपये, अमरावती विभागासाठी ११८ कोटी ४१ लाख रुपये, नाशिक विभागासाठी १ लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी ७७ कोटी ९७ लाख रुपये, नागपूर विभागासाठी १० कोटी ६५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ३६५ कोटी ६७ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान,अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तेथील शेतकऱ्याशी संवाद साधला होता. याला अनुसरून आता राज्याच्या महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय जारी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page