दोडामार्ग पोलिसांची बेकायदेशीर दारू वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई…

दोडामार्ग पोलिसांची बेकायदेशीर दारू वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई…

दोडामार्ग /-

गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना दोडामार्ग पोलिसांनी आंध्रप्रदेश येथील एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख १६ हजाराच्या दारुसह ८ लाख किमतीची टेम्पो ट्रॅव्हल्स गाडी असा मिळून तब्बल सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री १.४४ च्या सुमारास विजघर चेक पोस्ट येथे करण्यात आली. महेंद काटना रा. आंध्रप्रदेश असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबतची तक्रार पोलीस हवालदार आशिष लवांगरे यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ,गवस व सुतार यांनी केली.

अभिप्राय द्या..