You are currently viewing चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाला युट्युब व सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश न दिल्याने कार्यक्रमावर बहिष्कार…

चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाला युट्युब व सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश न दिल्याने कार्यक्रमावर बहिष्कार…

सिंधुदुर्ग /-

चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाला युट्युब सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश न दिल्याने व प्रवेश कार्ड माहिती अधिका-यांनी देण्यास उडवाउडविची उत्तरे दिल्याने जिल्ह्यातील सर्व युट्युब सोशल मिडिया पत्रकार ९ आॅक्टोंबर रोजी होण्या-या चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार– म.रा मराठी पत्रकार जिल्हा संघटना

आज आंजिवडे घाटरस्ता पाहणीसाठी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक आले असता जिल्हातील सर्व युटयुब सोशल मिडिया पत्रकारांनी माणगाव येथे भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी खासदार राऊत यांच्याशी चर्चा केली असता राऊत यांनी फक्त ३५ पत्रकारांना च प्रवेश देण्यात येणार आहे. यातील मुंबई सिंधुदुर्ग येथील ७० पत्रकारांची यादी आली आहे त्यातील ३५ पत्रकारांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रार्दुभाव होणार आहे का?
यावेळी पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होणार नाही का?
या कार्यक्रमाला कोरोनाच्या सर्व अटी शर्ती चे पालन केले जाणार आहे का?

यावेळी खासदार यांनी जिल्ह्यामध्ये ३५०पत्रकार असल्याचे उल्लेख केला आहे. जर यु टुब सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश नाही असे त्यांचे म्हणणे असेल तर काही यु टुब सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश कार्ड कशी देण्यात आली जर खासदार व पालकमंत्री यांना चिपी विमानतळ कार्यक्रमा साठी यु टुब सोशल मिडियाची गरज नसेल तर आज पासून खासदार व पालकमंत्री यांच्या सर्व कार्यक्रमवर आम्ही पत्रकार बहिष्कार टाकत आहोत

यावेळी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर, उपाध्यक्ष समील जळवी, कुडाळ तालुकाध्यक्ष कृष्णा सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय भाईप, खजिनदार सिध्दिका भांडये, कुडाळ तालुका सचिव मिलिंद धुरी, आनंद कांडरकर, अल्लाउदिन खुल्ली तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..