You are currently viewing सावंतवाडी बस स्थानक सध्या बनलंय तमाशाचा अड्डा लवकरच संपूर्ण प्रकरणाचा पुराव्यानिशी वेधणार व्यवस्थापकाचा लक्ष.;जे डी नाडकर्णी.

सावंतवाडी बस स्थानक सध्या बनलंय तमाशाचा अड्डा लवकरच संपूर्ण प्रकरणाचा पुराव्यानिशी वेधणार व्यवस्थापकाचा लक्ष.;जे डी नाडकर्णी.

सावंतवाडी /-

सध्या करोनाच्या काळात प्रतिबंध असतानासुद्धा सावंतवाडी एसटी आगारा मध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून एस टी मधील काही कर्मचाऱ्यांनी करोनाची कुठलीही पर्वा न करता वैयक्तिक कार्यक्रम पार पाडला अशामुळे त्यांनी स्वतःचाच जीव नाही तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्व प्रवाशांचा जीव देखील धोक्यात घातलेला आहे ,स्वतःचीच घरची मालमत्ता असल्याप्रमाणे ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाची व्यवस्था केली होती व जे जे लोक या कार्यक्रमात सामील झाले होते त्या सर्वांवर विभागीय चौकशी झालीच पाहिजे व त्यांना योग्य तो दंड झाला पाहिजे असे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेची मागणी असून या सर्व प्रकरणाची ध्वनिफित तसेच छायाचित्र लवकरच महाव्यवस्थापकका कडे सुपूर्त करण्यात येतील. असल्या नियमबाह्य काम करणाऱ्या लोकांमुळेच एसटी विभाग डबघाईला आलेले असून या सर्वांवर कारवाई होणे गरजेचे आहे असले कार्यक्रम राबवून सदर कार्यक्रमाला जागा देऊन सदर जागेचे भाडे, असले अधिकारी हे आपल्या खिशात तर घालत नाहीत ना याची पण चौकशी होणे गरजेचे आहे, तसेच त्या कार्यक्रमाच्या वेळेस एसटी आगारामध्ये पार्ट्या करून त्यात सर्व कर्मचाऱ्यांनी एसटीचे मालमत्तेचे नुकसान तर केली नाही ना हे पण तेवढेच बघणे गरजेचे आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा