You are currently viewing कणकवलीत डाटा एंट्री ऑपरेटरचे प्रशिक्षण..

कणकवलीत डाटा एंट्री ऑपरेटरचे प्रशिक्षण..

कणकवली /-

जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग (भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता विकास केंद्र सलग्न) मार्फत डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षण सुरू होत आहे. यासाठी प्रथम आलेल्या २० जणांना प्रवेश दिला जाईल. सदर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परीक्षा होवून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र डाटा एंट्री ऑपरेटर नोकरीसाठी किंवा स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरेल. प्रशिक्षण कालावधी 6 महिने असून अगदी माफक फी आकारून प्रवेश दिला जाईल. तरी इच्छुक उमेदवारांनी १० सप्टेंबर, २०२१ पर्यंत नाव नोंदणीसाठी
संपर्क साधावा. यासाठी व्यवस्थापक युवा कौशल्य विकास संस्था वागदे, टॅलेक्स अकॅडमी कणकवली, हर्णे आळी, कणकवली, आरोलकर बिल्डिंग, ता. कणकवली येथे किंवा विरेन गायकवाड मोबा. 7588450104, 9850430104 या नंबरवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..