You are currently viewing गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी अधिकाऱ्यांना मांडवी एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवास करून केले मार्गदर्शन..

गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी अधिकाऱ्यांना मांडवी एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवास करून केले मार्गदर्शन..

सिंधुदुर्ग /-

आज २४ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक श्री.राजेंद्र दाभाडे यांनी महिलांवरील वाढते अत्याचार व मालमत्ता चोरीच्या अनुषंगाने सायंकाळच्या मांडवी एक्सप्रेस ने वैभववाडी रेल्वे स्थानक ते सावंतवाडी रेल्वे स्थानक असा त्या त्या पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रेल्वे अधिकारी व महिला अधिकारी यांच्यासह प्रवास करून उपाय योजना संदर्भात तसेच मागील गुन्ह्याचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले आहे.

वैभववाडी पोलीस निरीक्षक जाधव कणकवली पोलिस निरीक्षक श्री गोंधळेकर पोलीस निरीक्षक श्री हुलावळे कुडाळ पोलीस निरीक्षक श्री मेंगडे व सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री सय्यद तसेच ला अत्याचार कक्षा सिंधुदुर्ग श्रीमती पोलीस उपनिरीक्षक शिंदे मॅडम तसेच अन्य अंमलदार सहभागी झाले होते तसेच उपाय योजना करून रेल्वे व रेल्वे स्थानक जवळ होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्या संदर्भात मार्गदर्शन केले.

अभिप्राय द्या..