You are currently viewing बोलून नाही तर कुडाळ भाजपने हटके करुन दाखवल.

बोलून नाही तर कुडाळ भाजपने हटके करुन दाखवल.

कुडाळ /-

कुडाळ स्थानकावरील बीएसएनएल दूरधवनी बंद होऊन २ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून गेलाहोता.महाराष्ट्रात जिल्ह्यातील परिवहन मंत्री असूनही शिवसेनेच्या पालकमंत्री,खासदार,आमदाराना प्रवाशांच्या संपर्कासाठी साधन उपलब्ध करून देता आले नाही मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी सतत गेले दोन वर्षे पाठपुरावा करून प्रवाशांच्या फायद्यासाठी संपर्काची फार मोठी गोष्ट करून दाखवली.यासाठी व इतर समस्यांसाठी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली,जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश तेंडुलकर,जिल्हा चिटणीस बंड्या सावंत , कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे ,युवा नेते आनंद शिरवलकर,कुडाळ तालुका सरचिटणीस योगेश बेळणेकर ,शक्ती केंद्र प्रमुख निलेश परब यांनी अखेर १६ जुलै रोजी थेट विभाग नियंत्रक कार्यालयात धडक दिली होती व ग्रामीण फेऱ्या ,प्रवाशी शेड तसेच संपर्क क्रमांक उपलब्ध करण्यासाठी मागणी केली होती त्याप्रमाणे कोरोना मुळे बंद झालेल्या ग्रामीण फेऱ्या जिल्ह्यात पहिल्यांदा कुडाळ आगाराने चालू केल्या तसेच शेडसाठीचे सामान सुद्धा उपलब्ध करून दिले असून आजपासून कुडाळ आगाराबाहेरील एस टी सुटण्याच्या स्थानकाच्या वाहतूक नियंत्रकाकडे मोबाईल क्रमांक ८७९९८९३३४२उपलब्ध करून देण्यात आला आहे .पुन्हा आपल्या विभाग नियंत्रक जागेवर रुजू झालेले प्रकाश रसाळ तसेच इतर अधिकारी कांबळी,गोसावी,खराडे,कुबडे ,नेरुरकर यांचे कुडाळ भाजपने सहकार्य केल्याबद्दल आभार मानले असून यापुढेही असेच सहकार्य मिळेल अशी भावना व्यक्त केली आहे . छोटयाशा संपर्क क्रमांकापासून ते कोविड सेंटर ,विमानतळासारख्या जागतिक पातळीवरची कामे जिल्ह्यात फक्त भाजपच करू शकतो हे पुन्हा एकदा या निमित्ताने जनतेला समजले आहे असे प्रतिपादन भाजपने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे .

अभिप्राय द्या..