You are currently viewing ओसरगाव सोसायटीच्या नूतन इमारतीचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन..

ओसरगाव सोसायटीच्या नूतन इमारतीचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन..

कणकवली /-

ओसरगाव येथील लिंग माउली विकास सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड या संस्थेची नूतन इमारत बांधली जाणार आहे. त्या इमारतीचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले. या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी सतीश सावंत, आमदार वैभव नाईक यांचा लिंग माउली सहकार सेवा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी ओसरगाव लिंग माऊली सोसायटीचे चेअरमन प्रदीप तळेकर, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, माजी उपसरपंच बबली राणे, चंदना राणे, पोलीस पाटील संचना आंगणे, दिलीप राणे, बाळा परब, नंदकुमार गावडे विश्वनाथ आलव, भगवान आलव, विद्याधर मेस्त्री, कृष्णा तांबे, लक्ष्मण तांबे, सत्यवान देसाई, प्रदीप राणे, गणेश राणे, हेमंत तांबे, संचालक मंडळाचे सदा मोरे, प्रभाकर सावंत विजय परब आदी उपस्थित होते.

या इमारतीच्या उभारणीसाठी माजी उपसरपंच बबली राणे यांच्या कुटुंबीयांनी तसेच समाज बांधवांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे तेथील भूमिपूजनावेळी पूजेचा मान त्यांना देण्यात आला.

अभिप्राय द्या..