You are currently viewing माजी नगरसेविका सौ.साक्षी सावंत यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील कातकरी बांधवांना कोरोनाचे १२५ डोस उपलब्ध…

माजी नगरसेविका सौ.साक्षी सावंत यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील कातकरी बांधवांना कोरोनाचे १२५ डोस उपलब्ध…

कुडाळ /-

कुडाळ शहरातील माजी नगरसेविका सौ.साक्षी विजय सावंत यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील कातकरी बांधवांना कोरोनाचे १२५ डोस हे कातकरी बांधवांच्या कुडाळ शहरातील वस्तीवर उद्द्या दिनांक २४सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे तरी सर्व कातकरी बांधवानी या कोरोनाच्या कोव्हिडं शिल्ड या डोस चा लाभ घ्यावा असे आव्हान माजी नगरसेविका साक्षी विजय सावंत यांनी केले आहे.तुपट वाडी येथील कातकरी बांधवांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती की ,आपल्याला कोरोनाचे डोस मिळावेत याच कारणास्तव माजी नगरसेविका साक्षी सावंत यांनी यासाठी जिल्हा परिषदेचे गटनेते रणजित देसाई आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता.याची दखल घेत आज कातकरी बांधवांसाठी १२५ कोव्हिडं शिल्ड चे डोस आरोग्य विभागाने उपलब्ध केले आहेत.

अभिप्राय द्या..