You are currently viewing सिंधुदुर्ग -मुंबईचा हवाई प्रवास करा फक्त अडीच हजारात..

सिंधुदुर्ग -मुंबईचा हवाई प्रवास करा फक्त अडीच हजारात..

सिंधुदुर्ग /-

एअरलाईन्स कंपनी अलायन्स एअर 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाण सुरू करणार आहे. ’अलायन्स एअर’ने नुकतेच मुंबई ते सिंधूदूर्ग विमान प्रवासाचे वेळापत्रक व तिकीट दर घोषित केले आहे. हा विमान प्रवास 2500 रूपयांत करता येणार असून अवघ्या दीड तासांत मुंबईतून सिंधुदुर्गात पोहोचता येणार आहे.

●जाणून घ्या वेळापत्रक
अलायन्स एअरचे फ्लाइट 9 ऑक्टोबर रोजी मुंबईहून 11.35 वाजता उड्डाण करेल आणि 1 वाजता सिंधुदुर्गला पोहोचेल. यानंतर, सिंधुदुर्गहून विमान दुपारी1.25 वाजता उड्डाण करेल आणि 2.50 वाजता मुंबईला पोहोचेल.

●असे असणार आहे तिकीट दर :*
अलायन्स एअरच्या मते, सुरुवातीला सर्व करांसह तिकीट किंमत मुंबई-सिंधुदुर्गसाठी 2,520 रुपये ठेवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग-मुंबई विमानाचे भाडे 2,621 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..