You are currently viewing नरडवे दिगवळे नाटळ दारीस्ते ग्रामस्थांसाठी एस.टी.सेवा सुरू करा.;सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची मागणी..

नरडवे दिगवळे नाटळ दारीस्ते ग्रामस्थांसाठी एस.टी.सेवा सुरू करा.;सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची मागणी..

कणकवली /-

माध्यमिक विद्यामंदिर कनेडीमधील विद्यार्थ्यांसाठी व नरडवे – दिगवळे – नाटळ – दारीस्ते ग्रामस्थांसाठी एस.टी.बस सेवा सुरू करावी अशी मागणी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विभाग नियंत्रक , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ , विभाग – कणकवली यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात सतीश सावंत म्हणतात,२२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली – कनेडी – नरडवे रत्यावरील मौजे नाटळ या गावातील मल्हारी नदीवरील पुलाचा काहीभाग जमिनदोस्त झाला असून , यामुळे पुढील गावांचा संपर्क तुटला आहे . माध्यमिक विद्यामंदिर कनेडी शाळेतील मुलांना शिक्षणासाठी व दशक्रोशीतील ग्रामस्थांना एस्.टी.बस नसल्याने गैरसोय होत आहे . तरी वरिल समस्यांचा गांभिर्याने विचार करुन विध्यार्थांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व नरडवे – दिगवळे – नाटळ – दारीस्ते गावातील ग्रामस्थांसाठी याठिकाणी पूर्वी सुरू असलेल्या एस्.टी.बसेस कणकवली – हळवल – शिवडाव – दारीस्ते या मार्गावरून सुरु करून गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांना मल्हारी पुलापर्यंत सोडण्याची व तेथून परत नेण्याची व्यवस्था करावी.तसचे इतरही गावातून वाहतूक फेऱ्या सुरु करून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी .अशी मागणी सतीश सावंत यांनी केली आहे.

अभिप्राय द्या..