You are currently viewing एका वर्षाच्याआत सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला..

एका वर्षाच्याआत सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला..

मुंबई /-

25 वर्षानंतर प्रथमच एका वर्षाच्या आत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिल्याप्रमाणे मोकळा झाला आहे. नॅशनल मेडिकल कॉन्सिलने यास 17 तारखेला मान्यता दिली असून यावर्षी एमबीबीएसच्या 100 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रथमच हे महाविद्यालय सुरू होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. याबद्दल खासदार विनायक राऊत, राहुल शेवाळे, आमदार रवींद्र वायकर, सुनील प्रभू, जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांनी आज मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

अभिप्राय द्या..