You are currently viewing कोंबड्या फस्त करणारा बिबट्या सी. सी. टीव्हीत कैद..

कोंबड्या फस्त करणारा बिबट्या सी. सी. टीव्हीत कैद..

वैभववाडी /-

वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे (पालकरवाडी) येथील रहिवासी रामचंद्र गावडे यांच्या घराच्या पडवीत सोमवारी पहाटेच्या वेळी कोंबडीवर डल्ला मारणारा बिबट्या सी. सी. टीव्ही मध्ये पहायला मिळाला.
रामचंद्र लक्ष्‍मण गावडे यांच्या घरातील पाठीमागच्या पडवीत कोंबड्या होत्या. सकाळी त्यातील एक कोंबडी कमी असल्याचे गावडे यांच्या निदर्शनास आले. कोंबडी फटकुऱ्याने पळवली असावी, असा अंदाज त्यांनी बांधला. रामचंद्र गावडे यांचा मुलगा सिद्धु गावडे याने आपल्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. त्यात ०३.५८ वा. घराशेजारील सालवा डोंगरातून बिबट्या घरातील पडवीच्या दिशेने येत असल्याचे दिसून आले. बिबट्याने घराच्या पडवीत प्रवेश करुन खुराड्यावर बसलेल्या कोंबडीकडे लक्ष जाताच त्याने कोंबडीवर झडप घातली व पुन्हा बिबट्या सालवा डोंगराकडे मार्गस्थ झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सालवा डोंगराच्या पायथ्याशी गावडे यांच्या घराच्या परिसरात थोडी लोकवस्ती आहे. त्यामुळे कोकिसरे पालकरवाडी व आजुबाजुच्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अभिप्राय द्या..