You are currently viewing जिल्हा बँक आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचाच झेंडा फडकवा.;केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंनी दिले पदाधिकाऱ्यांना आदेश..

जिल्हा बँक आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचाच झेंडा फडकवा.;केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंनी दिले पदाधिकाऱ्यांना आदेश..

भाजपा जिल्हा कार्यकारिणी केंद्रीयमंत्री राणेंच्या उपस्थितीत संपन्न..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी मजबूत आहे. संघटनात्मक बांधणी असल्यानेच आगामी जिल्हा परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला पाहिजे. त्या दृष्टीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत विरोधकांना रोखण्यासाठी सज्ज काम केले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. ओसरगाव येथील महिला भवन सभागृहात आयोजित भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष जयदेव कदम, सरचिटणीस प्रभाकर सावंत, अशोक सावंत, महिला आघाडी अध्यक्षा संध्या तेरसे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी सरकारने केलेली काम लोकांपर्यंत पोहचवा. माझ्या मंत्रालयाची कामे, रोजगार निर्मिती7 धोरणाची जनजागृती करा देश आणि राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी संघटनात्मक बांधणी आदर्शवत राहिली पाहिजे त्यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक या दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्याला यश मिळवलं पाहिजे उद्याचा उमेदवार कोणी असेल मात्र पक्षासाठी सर्वांनी काम केले पाहिजे जर पक्ष असेल तर आपण सर्व असणार आहोत याचे भान सर्वांनी राखले पाहिजे त्या ठिकाणी अंतर्गत गटबाजी न करता एकजुटीने विरोधकांचा पराभव करण्यासाठी कामाला कामाला लागा, असे सूचना ना. नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

मी केंद्रात मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्गात जन आशिर्वाद यात्रा घेऊन आलो. त्यावेळी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात मिळालेला प्रतिसाद पाहता आपली मेहनत दिसून येत आहे. मी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त करतो. कारण रात्री किती उशिरा गेल्यानंतर त्या ठिकाणची गर्दी पाहता आणि उत्स्फूर्तपणे माझे स्वागत जल्लोष केला आहे, मी हे कदापि विसरणार नाही. माझा कार्यकर्ता हीच माझी ताकद असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.

अभिप्राय द्या..