You are currently viewing मालवणात होणार २२ सप्टेंबरला पोलिस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळा..

मालवणात होणार २२ सप्टेंबरला पोलिस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळा..

मालवण /-

मालवण येथील‘अत्त दीप भव प्रतिष्ठान’च्या वतीने बुधवार २२ सप्टेंबर रोजी एकदिवसीय पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना कार्यशाळेच्या माध्यमातून लेखी व मैदानी परीक्षेबाबत तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशोत्सवानंतर पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलीस भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरलेले आहेत, असे उमेदवार पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घेऊ शकतात. या कार्यशाळेत पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मराठी, गणित, बुद्धिमत्ता या विषयाचे मार्गदर्शन करणारे शिक्षक उमेदवारांना मार्गदर्शन करतील. १०० गुणांच्या लेखी परीक्षेबाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन तसेच मैदानी परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवण्यासाठीच्या‘ट्रिक्स’ अनुभवी पोलिसांकडून दिले जाणार आहेत. पोलीस चालक भरतीबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. हे शिबीर विनामूल्य असून नावनोंदणी करणाऱ्या उमेदवारांनाच कार्यशाळेचा लाभ घेता येईल. कार्यशाळेच्या ठिकाण नावनोंदणी केल्यानंतर उमेदवारांना कळविले जाईल. इच्छुकांनी सिद्धेश आचरेकर (8275649254) यांच्याशी संपर्क साधावा.

अभिप्राय द्या..