You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील पाच दिवसीय गणपतींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन..

सावंतवाडी तालुक्यातील पाच दिवसीय गणपतींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन..

सावंतवाडी /-

 

गणपती बाप्पा मोरया’, मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात सावंतवाडी शहर व तालुक्यातील पाच दिवसांच्या गणपतींचे भक्तीमय वातावरणात सायंकाळी विसर्जन करण्यात आले.सावंतवाडी शहरात आज पाच दिवसीय बहुतेक गणपतींचे फटाक्यांच्या आतषबाजीत मोती तलावात विसर्जन करण्यात आले. शहरात विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. उशिरापर्यंत हे विसर्जन चालू होते. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती गेले गावाला चैन पडेना अशा जयघोषात शहर व तालुक्यातील कोलगाव, कुणकेरी, मळगाव, माडखोल, माजगाव, मडुरा, चिपटे, तळवडे, न्हावेली, कोनापाल, मळेवाड, नेमळे आदी गावातील पाच दिवसीय गणपतींचेही आज विसर्जन करण्यात आले.

अभिप्राय द्या..