You are currently viewing सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या जादा एसटी गाड्या सुरू…

सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या जादा एसटी गाड्या सुरू…

सावंतवाडी /-

सावंतवाडी आगारातून १२ सप्टेंबरपासून लांब पल्ल्यांच्या जादा एसटी गाड्या सोडण्यात आल्या आहेत. अशी माहिती सावंतवाडी आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. प्रसिद्धी पत्रकात पडोळे यांनी म्हटले की, सावंतवाडी – पुणे निगडी आंबोलीमार्गे (शिवशाही वातानुकूलित) सायंकाळी ६.४५ वाजता, सावंतवाडी-पुणे निगडी आंबोलीमार्गे (शिवशाही वातानुकूलित) सायंकाळी ७.४५ वाजता, सावंतवाडी-पुणे निगडी गगनबावडामार्गे (साधी) रात्री ८.१५ वाजता अशा बस सोडण्यात आल्या आहेत, असे आगारप्रमुख पडोळे यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..