You are currently viewing हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुभाष साबळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…

हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुभाष साबळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…

सिंधुदुर्ग /-

हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुभाष साबळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सावंतवाडी दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुभाष साबळे यांना हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुवेदाचार्य डॉ. शिवानी गवंडे यांनी साबळे सरांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याविषयी गौरवोद्गार काढले. कोरोना लाॅकडाऊन काळात केलेली कोरोनाविषयक जनजागृती उल्लेखनीय आहे. त्यांना विविध स्तरातून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यावेळी हातभार चॅरिटेबल ट्रस्टने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन कार्याचा गौरव केला.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, शाल श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे अध्यक्ष शैलेश मयेकर, सचिव एकनाथ चव्हाण, अस्मिता भराडी, खजिनदार नयनेश गावडे व आदींची उपस्थिती होती.

अभिप्राय द्या..