You are currently viewing राज्यस्तरीय स्पर्धेत शिक्षक श्री.धोंडी वरक व दूर्वा केसरकर यांचे यश..

राज्यस्तरीय स्पर्धेत शिक्षक श्री.धोंडी वरक व दूर्वा केसरकर यांचे यश..


सावंतवाडी /-


जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य आयोजित चला जपूया संस्कृती गायन स्पर्धा- 2021 या स्पर्धेमध्ये कळसुलकर प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. धोंडी गंगाराम वरक. यांनी राज्यस्तरीय उत्तेजनार्थ क्रमांक तसेच याच शाळेची इयत्ता-तिसरीची विद्यार्थिनी कु.दूर्वा अतुल केसरकर हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या विजेत्या दोघांचेही अभिनंदन मुख्य आयोजक वैशाली भांबरे यांनी केले.कळसुलकर शाळेचे शिक्षक श्री वरक व विद्यार्थिनी दूर्वा केसरकर या दोघांचेही संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक,सहकारी शिक्षक यांनी कौतुक केले. या परीक्षेसाठी लहान गट,मोठा गट, खुला गट,ज्येष्ठ नागरिक अशा विविध गटांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. श्री.डी.जी. वरक यांनी मंगलाष्टके गायन स्पर्धा यामध्ये तर दुर्वा केसरकर हिने फुगडी गीत स्पर्धा यासाठी सहभाग घेतला होता. शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा निकाल जाहीर करण्यात आला.

अभिप्राय द्या..