सिंधुदुर्ग /-
जिल्हा परिषद मध्ये सत्ताधारी पक्षाचे रणजित देसाई यांनी आपले काम पालकमंत्री यांच्या कडून डावलले गेले असा आरोप करताच शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांनी देसाई यांचा आरोप खोडून काढत जिल्हा परिषद चा शेष फंड असतो तो आम्हा विरोधकांना दिला जात नाही.आमच्या सदस्यांची कामे डावलण्यात आली.यामध्ये शाळा दुरुस्तीची कामे जाणून बुजून डावलली गेली परिणामी आज त्या शाळांना गळती लागली आहे.आज त्या शाळेच्या इमारतीची काय परिस्थिती आहे याची जाऊन कधीतरी पाहणी करा.तसेच मागील दोन वर्षात आम्हा विरोधी सदस्यांना किती निधी दिला याची माहिती द्यावी अशी सूचना पडते यांनी केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री अमरसेन सावंत यांनी संजय पडते यांना साथ देत जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढते याला जबाबदार कोण असा सवाल केला व बाजार चालू ठेवा, मंदिर उघडा अशा प्रकारच्या मागण्या कोण करत होत आणि परिणामी आता काय झाल असा टोला लगावला तर संजय पडते यांनी सगळ उघडा म्हणून घंटानाद करून सांगणारे आता बंदची हाक देत आहेत असं सांगून विरोधकांची बोलती बंद केली.तर पडते यांनी कोरोना वरून राजकारण नको असा सबुरीचा सल्ला सुद्धा दिला व व्यापारी स्वत:हून बाजारपेठ बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करत आहेत हे सुद्धा निदर्शनास आणून दिले.