You are currently viewing प्राथमिक शिक्षक संघ देणार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला रुग्णवाहिका.;६ रोजी वितरण सोहळा..

प्राथमिक शिक्षक संघ देणार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला रुग्णवाहिका.;६ रोजी वितरण सोहळा..

ओरोस /-

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा सिंधुदुर्गच्यावतीने ९ लाख रुपये किंमतीची रुग्णवाहिका जिल्हा परिषदेला देण्यात येणार आहे. याचा लोकार्पण सोहळा ६ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संघटनेचे माजी राज्याध्यक्ष तथा राज्य सल्लागार प्रकाश दळवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे होणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष के टी चव्हाण व सरचिटणीस गुरुदास कुबल यांनी दिली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार असून जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, शिक्षण व आरोग्य समिती सभापती डॉ अनिशा दळवी, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. मार्च २०२० ते जून २०२१ या कालावधीत कोरोनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांसाठी रुग्णवाहिका ही एक आवश्यक गरज बनून राहिली होती. याची जाणीव आम्हा शिक्षकांना झाली आणि ही आरोग्याची समस्या सोडविण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्या सदस्यांनी जिल्हाभर आर्थिक मदत जमा करत रुग्णवाहिका खरेदी केली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले होते. अशा वेळी जिल्ह्याच्या तळागाळातील ग्रामिण भागात ही सेवा पोहचविण्यासाठी संघटनेने खारीचा वाटा उचलला आहे, असे संघटनेचे अध्यक्ष के टी चव्हाण व सरचिटणीस गुरुदास कुबल यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..