राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून मांगेली येथील प्रमिला गवस हिला शिलाई मशीन सुपुर्द..

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून मांगेली येथील प्रमिला गवस हिला शिलाई मशीन सुपुर्द..

दोडामार्ग /-

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून मांगेली-फणसवाडी येथील प्रमिला गवस हिला शिलाई मशीन सुपुर्द करण्यात आली.घरातील कमवती व्यक्तींचे निधन झाल्याने उज्वला गवस यांच्या कुंटुबियांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून कुंटुबियांचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून आज गुरुवारी त्यांची मुलगी प्रमिला दत्ताराम गवस हीला शिलाई मशीन सुपुर्द करण्यात आली. यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, तालुकाध्यक्ष प्रदिप चांदेलकर, संदिप गवस, दिपक जाधव, रामचंद्र ठाकुर, प्रविण गवस आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..