वैभववाडी रेल्वे स्टेशन ते भुईबावडा एसटी बस सेवा गणपती उत्सवासाठी ४ सप्टेंबर पासून सुरू..

वैभववाडी रेल्वे स्टेशन ते भुईबावडा एसटी बस सेवा गणपती उत्सवासाठी ४ सप्टेंबर पासून सुरू..

वैभववाडी /-

दरवर्षी गणेशोत्सव काळात कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी नेहमीच सज्ज असते. गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वैभववाडी तालुक्यात गणेशोत्सवाला दाखल होणाऱ्या वैभववाडी- भुईबावडा मार्गावरील अनेक गावांत रेल्वे स्टेशन पासून प्रवासासाठी एस टी सुविधा नसल्याने या मार्गावरील गावांमधील रहिवाशांना रेल्वे स्टेशन ते आपल्या गावापर्यंत रिक्षा व इतर वाहतूक साधणांवर अवलंबून रहावे लागते. अनेक वेळा हे प्रवाशांसाठी गैरसोयीचे होते. या सर्व पार्श्वभूमीवर वैभववाडीतील उंबर्डे गावचे सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत मुद्रस यांनी मागणी करून पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून वैभववाडी रेल्वे स्टेशन ते भुईबावडा एसटी वाहतूक सेवा ४ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. वैभववाडी रेल्वे स्टेशन ते भुईबावडा एसटी बस सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद होती.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य उदय मुद्रस, ब्रह्मदेव सेवा मंडळाचे खजिनदार संजय शिरसाट, ब्रह्मदेव सेवा मंडळाचे सदस्य विनय मुद्रस, राजेंद्र मुद्रस, श्रीकांत मुद्रस आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..