दोडामार्ग विजघर येथे तब्बल आठ लाखाची लाखांची दारू जप्त.;दोडामार्ग पोलिसांची कारवाई..

दोडामार्ग विजघर येथे तब्बल आठ लाखाची लाखांची दारू जप्त.;दोडामार्ग पोलिसांची कारवाई..

दोडामार्ग /-

बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी कर्नाटक व गोवा येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज सकाळी सव्वा पाचच्या सुमारास विजघर चेकपोस्टवर करण्यात आली. यात तब्बल ८ लाखाच्या दारूसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहीती दोडामार्ग पोलिस निरिक्षक रिझवाना नदाफ यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तात्रय हनुमंत खानापुरे (५५) रा. खासबाग-वडरचौनी, बेळगाव व विल्यम कैतान डायस (६०) रा. फातोर्डा स्टेडियम जवळ, मडगाव-गोवा, अशी संशयितांची नावे आहेत.संबंधित दोघेही संशयित टेम्पो मधून ही दारू वाहतूक करत होते. दरम्यान ते येथील विजघर चेक पोस्ट येथे आले असता त्यांच्या वाहनांची पोलिसांनी तपासणी केली. यावेळी त्यांच्या गाडीत तब्बल आठ लाख रुपयांचा दारूसाठा आढळून आला. दरम्यान त्यांच्यावर कारवाई करत अठरा लाखाच्या टेम्पोसह तब्बल पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..