मालवण /-

मालवण वायरी जाधवाडी येथील धीरज संजय भगत या २५ वर्षीय युवकाने बंद असलेल्या रिसोर्टच्या मागील जिन्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी वायरी येथे घडली. धीरज भगत हा अविवाहित होता त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. वायरी जाधववाडी येथील धीरज भगत हा तारकर्ली येथील पर्यटन केंद्राच्या स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे कामाला होता. तो आपली आई,वडील,आणि भाऊ यांच्या समवेत रहात होता शांत स्वभाव व मितभाषिपणा या स्वभावामुळे तो सर्वांना परिचित होता. आज सकाळी नऊ वाजता धीरज याने बाजारातून घरात भाजी आणून दिली व तो घराबाहेर गेला होता त्यानंतर तो कोणाला दिसला नाही आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास धीरज याचा मृतदेह पांडुरंग मालवणकर यांच्या मालवणकर रिसॉर्टच्या मागील जिन्याला गळफास लावलेल्या स्थितीत वायरी जाधववाडी येथील ग्रामस्थांना निदर्शनास आला. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी मालवण पोलिसांना दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, भाई मांजरेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, प्रदीप मांजरेकर, दिलीप घारे, बंड्या लुडबे, सरपंच घनश्याम ढोके, नाना नाईक, गणेश कुडाळकर, दादा मायबा, जितू मायबा, मंदार बोडवे, ताराचंद पाटकर, जयंत पाटकर, नितीन गवंडे, वैभव नागवेकर, सुरेश मायनाक यांनी भगत कुटुंबियांचे सांत्वन केले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक एस.एस. ओटवणेकर, उपनिरीक्षक सचिन पाटील, सिद्धेश चिपकर, श्री. पांचाळ यांनी पंचनामा केला. धीरज याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. धीरज काही दिवस तणावात वायरी जाधववाडी येथील धीरज भगत तारकर्ली पर्यटन केंद्रातील कामा बरोबरच मोलमजुरीही करायचा. धीरज मालवणकर हा गेले काही दिवस तणावाखाली वावरत होता अशी चर्चा ग्रामस्थांत या घटनेनंतर सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page