खारेपाटण मध्ये सापडला गोव्यातील बेपत्ता युवक.;खारेपाटण पोलिसांची सतर्कता..

खारेपाटण मध्ये सापडला गोव्यातील बेपत्ता युवक.;खारेपाटण पोलिसांची सतर्कता..

खारेपाटण /-

गोवा म्हापसा येथून ५ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला युवक रुदरेश पिळणकर वय २४ वर्षे यास खारेपाटण कोविड ड्युटी वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. बेपत्ता मुलाचे नातेवाईक हे खारेपाटण ला येऊन रुदरेश पिळणकर याला घरच्यांनी ताब्यात घेतले. आपला मुलगा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाल्याने घरच्यांनी पोलिसांचे आभार मानले.

एक वाहन चालक योगेश अशोक हेरेकर रा. पावशी ता. कुडाळ याने खारेपाटण टाकेवाडी या ठिकाणी एक मुलगा रस्त्याचे कडेला असल्याचे ड्युटीवरील पोलिसांना सांगताच वाहतूक पोलीस अंमलदार प्रकाश गवस, उद्धव साबळे, सुयोग पोकळे यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन जंगलमय भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपातून त्या बेपत्ता झालेल्या युवकास ताब्यात घेतले. आणि त्याच्या वडिलांना कळविले. सदर युवक बेपत्ता झाल्याबाबत म्हापसा पोलीसठाण्यात ५ दिवसांपूर्वी नोंद करण्यात आली होती. रुदरेश पिळणकर याची वैद्यकीय तपासणी करून त्याला घरच्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..