You are currently viewing झिलू गोसावी यांना राष्ट्रस्तरीय गुणवंत पुरस्कार जाहीर..

झिलू गोसावी यांना राष्ट्रस्तरीय गुणवंत पुरस्कार जाहीर..

मालवण /-

आविष्कार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबविते. या संस्थेचा राष्ट्रस्तरावरील मानाचा मानला जाणारा राष्ट्रीय पातळी वरील सन २०२१ च्या राष्ट्रस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भोगवे शेळपीचे पदवीधर शिक्षक झिलू दादू गोसावी यांची निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची नोंद घेऊन ह्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिनांक ०५ सप्टेंबर २०२१ रोजी संपन्न होणार आहे.

अभिप्राय द्या..