You are currently viewing स्कुबा डायव्हिंगचे पथक घेणार भूषण नाईकचा शोध.;नदीत बुडून 2 दिवस उलटूनही थांगपत्ता नाही..

स्कुबा डायव्हिंगचे पथक घेणार भूषण नाईकचा शोध.;नदीत बुडून 2 दिवस उलटूनही थांगपत्ता नाही..

वैभववाडी /-

लोरे नं 2 गावातील शिवगंगा नदीत 28 ऑगस्ट रोजी बुडालेल्या भूषण नाईक ( रा.पुणे ) याचा 2 दिवस उलटूनही थांगपत्ता लागलेला नाही. नदीत बुडालेल्या भूषण चा मालवण येथील स्कुबा डायव्हिंग चे पथक आज शिवगंगा नदीपात्रात शोध घेणार आहे. लोरे येथील आपल्या मित्राच्या घरी आलेल्या भूषण नाईक शिवगंगा नदीत पोहत असताना कोळदा कोंडीत बुडाला होता. देवघर धरणाचे पाणी शिवगंगा नदीपात्रात सोडले असल्यामुळे पाण्याचा प्रवाह जोरदार होता. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. त्यानंतर काल 29 ऑगस्ट रोजी दिवसभर तहसीलदार रामदास झळके यांनी करूळ येथील जीवरक्षक पथकाच्या मदतीने भूषण चा नदीत शोध घेतला. परंतु भूषण चा शोध लागला नव्हता. अखेर आज मालवण येथील स्कुबा डायव्हिंग पथकाला भूषण च्या शोधासाठी बोलावण्यात आले आहे. स्कुबा डायव्हर्स आज नदीपात्रात भूषणचा शोध घेणार आहेत.

अभिप्राय द्या..