पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा..

पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा..

सिंधुदुर्गनगरी /-

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या शुक्रवार दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दुपारी 1 वा. ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालय येथे अरुणा प्रकल्प, देवघर प्रकल्पाबाबत आढावा बैठक, दुपारी 1.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाबाबतची सद्यस्थिती संदर्भात आढावा बैठक, दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व गटविकास अधिकारी यांच्यासमवेत चर्चा, दुपारी 2.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासमवेत बैठक, दुपारी 3.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा व्यवस्थापक, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, अग्रणी बँक व इतर राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी यांच्या समवेत शासनाच्या विविध योजनांच्या समन्वयाबाबत बैठक, दुपारी 3.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, दुपारी 4 वा. ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण.

अभिप्राय द्या..