You are currently viewing नेत्यांनी बोलताना काही पथ्य पाळायला हवीत.;भाजप खासदारांचा घरचा आहेर,राणेंची ब्राह्मण टिपणी टोचली?

नेत्यांनी बोलताना काही पथ्य पाळायला हवीत.;भाजप खासदारांचा घरचा आहेर,राणेंची ब्राह्मण टिपणी टोचली?

पुणे /-

आम्ही नारायण राणेंच्या वक्तव्याचं अजिबात समर्थन करत नाही. पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश बापट यांनी राणेंना अप्रत्यक्षरीत्या सुनावलं आहे. राजकीय पक्षांमध्ये राजकीय मतभेद असतात. पण नेते मंडळींनी बोलताना पथ्य पाळलं पाहिजे, अशा शब्दात खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना घरचा आहेर दिला.

भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नारायण राणेंना घरचा आहेर दिला. राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षातील नेत्यांनी बोलताना भाषण करताना काही पथ्य पाळली पाहिजेत. त्यात सर्वच पक्ष आहेत. त्यात मुख्यमंत्री असतील, नारायण राणे असतील यांनी आपआपली मते मांडायला हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात, मग त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होतं. हे सर्वांनी टाळलं पाहिजे, असं बापट म्हणाले.

शुद्धीकरणासाठी ब्राह्मण हवा होता:-

राणेंच्या भेटीनंतर शिवसेनेने शिवाजीपार्क येथील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले होते. त्यावरून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. शुद्धीकरणासाठी ब्राह्मण लागतो. शिवसेनेकडे आहेत कुठे? आमच्याकडे मागायला हवा होता.आमच्याकडे खूप आहेत, असा टोला नारायण राणे यांनी लगावला होता. दरम्यान, हा टोला भाजपमधील ब्राह्मण नेत्यांनाही लागल्याचं बोललं गेलं आणि आज गिरीश बापट यांनी दिलेली प्रतिक्रिया त्याचाच भाग असल्याची चर्चा आहे.

अभिप्राय द्या..