ठाणे नौपाड /-

ठाण्यातील मखमली तलाव येथील नीलकंठ सोसायटी मध्ये राहणारे व सोन्या चांदीचे व्यापारी भरत जैन यांचे आपहरण होऊन हत्या झाली होती, या हत्येमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली होती.

परिस्थितीचे गांभीर्य बघून नौपाडा विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दोन पथक तयार केली,व तपासास सुरुवात केली, प्रथम भरत जैन यांच्या दुकानातील व परिसरातील 16 हुन अधिक सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली, त्या मध्ये त्यांना एक संशयीत वॅगनार कार परिसरात फिरताना आढळली, या कारमालकाचा शोध घेतला असता ही कार घणसोळी नवी मुंबई येथील सुभाष बाबुराव सुर्वे वय 39 याची असल्याचे निष्पन्न झाले, त्याला ताब्यात घेतल्या नंतर त्याच्या कडे सखोल चौकशी केली असता व तांत्रिक तपास केला असता, त्याने त्याचे साथीदार अतुल जगदीशप्रसाद मिश्रा वय 25, राहणार सिद्धेश्वर तलाव ठाणे व निलेश शंकर भोईर वय 35 वर्ष राहणार महात्मा फुले नगर कळवा ठाणे यांच्या सोबत मिळून मयत भरत जैन या गुन्ह्याचा कट रचल्याचे कबूल केले.

आरोपी अतुल मिश्रा हा मयत भरत जैन राहत असलेल्या सोसायटी मध्ये अडीच वर्षा पूर्वी वॉचमन म्हणून कामास होता, त्यामुळे त्यास भरत जैन यांचे ज्वेलर्सचे दुकान असल्याचे तसेच त्याचा दुकानात जाण्यायेण्याचा मार्ग माहिती होता, त्या प्रमाणे त्यांनी प्लॅन बनवून दिनांक 14/08/2021 रोजी रात्री 10:30 च्या दरम्यान भरत जैन मखमली तलाव परिसरातून घरी पायी जात असताना आरोपी यांनी रिव्हालवरचा धाक दाखवून त्यांच्या कडच्या वेगनार कारमध्ये बसवून मुंबई नाशिक हायवेवर घेऊन गेले, या वेळी आरोपी अतुल मिश्रा याला भरत जैन यांनी ओळखले त्यामुळे आपली ओळख पोलिसांना सांगेल व आपले बिंग फुटेल या भीतीने आरोपींनी भरत जैन यांचा रस्सीने गळा आवळून खून केला त्यांच्या खिशातील चावी काढून घेऊन त्यांचे शव हात पाय बांधून कळवा खाडीत फेकून दिले त्यानंतर आरोपींनी बी के ज्वेलर्स हे दुकान चावीने उघडून दुकानातील चांदीचे दागिने व भांडी चोरी केली.

या गुन्ह्यातील आरोपी निलेश शंकर भोईर व अतुल जगदीशप्रसाद मिश्रा हे दोघे कल्याण मार्गे कोईबत्तूर, ओरिसा, बिहार येथुन उत्तरप्रदेश येथे पळून जाणार असल्याचे पोलिसांना समजले त्या प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे आपल्या सहा जणांच्या पथकासह उत्तर प्रदेश येथे अगोदरच जाऊन पोहचले त्या नंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या दोन्ही आरोपींना पळून जाण्याकरिता मदत करणाऱ्या बळवंत मारुती चोळेकर वय 36 राहणार महारळगाव, कल्याण याला अटक करण्यात आली व त्याच्या कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले चांदीचे दागिने व भांडी असा 1,24,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page