१५० कोटी थकवले भाजप आ.राहुल कुल यांच्या साखर कारखान्याला जप्तीची नोटीस..

१५० कोटी थकवले भाजप आ.राहुल कुल यांच्या साखर कारखान्याला जप्तीची नोटीस..

पुणे /-

पुणे जिल्ह्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याला जप्तीची नोटीस आली आहे. आमदार राहुल कुल यांच्या ताब्यातील भीमा पाटस साखर कारखान्याने पुणे जिल्हा बँकेचे तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. त्यामुळे बँकेने ही नोटीस बजावली आहे.

भीमा पाटस कारखान्याने PDCC बँकेचे 150 कोटी थकवले:-

गेल्या दोन वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेचं कर्ज परतफेड करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. पण तीन वर्षांपासून साखर कारखाना बंद असून, सुरु होण्याची काहीच लक्षणे दिसत नसल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दीडशे कोटी थकबाकी वसुलीसाठी भीमा पाटस साखर कारखान्याना जप्तीची नोटीस बजावलीये.थकीत कर्ज परतफेड त्वरीत न केल्यास कारखाना बँक ताब्यात घेईल अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईमुळे दौंड तालुक्यातील राजकारण पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत. सन 2017 – 2018 पासून भीमा पाटस साखर कारखाना बंद आहे. त्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तब्बल 36 कोटी रुपयांची मदत करण्यात आली. परंतु शासनाची मदत मिळवून देखील कारखान्याचे नेतृत्व करणारे आमदार राहुल कुल कारखाना सुरु करू शकले नाही.

अभिप्राय द्या..